मुंबई

अँकर तरुणीची इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या,मित्राच्या फ्लॅटवर पार्टी करायला गेली.

मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरात एका अँकर तरूणीचा इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे.

  • मुंबई- मालाड भागात एका सोसायटीत महिला अँकरचा अर्धनग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. बलात्कारानंतर तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांना आहे. तर तरुणीने इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली असावी असाही प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.

अर्पिता तिवारी (वय-25) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती इव्हेंट शोमध्ये अँकरिंगचे काम करत होती. ती मित्राच्या फ्लॅटवर पार्टी करण्‍यासाठी गेली होता.

मालाडच्या मालवणी परिसरात सोमवारी पहाटे ही घटना घडली. अर्पिताने मानवस्थळ इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरील, 1501 क्रमांकाच्या घरातून उडी घेऊन जीवन संपवलं. मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला पाहून रहिवाशांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मात्र उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या कृत्यामागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

अर्पिता तिवारीचं लवकरच प्रियकरासोबत लग्न होणार होतं. सात वर्षांपासून एकत्र असलेली ही जोडी या इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरील घरात आली होती. हे घर तिच्या प्रियकराच्या ओळखीच्या व्यक्तीचं होतं. त्यामुळे इथे नेमकं काय घडलं या दृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत. तसंच मोबाईल कॉल रेकॉर्डही तपासलं जाणार आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: