मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलनाक्याजवळ कार टेम्पोचा भीषण अपघात 3 ठार

खालापूर टोलनाक्याजवळ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास कार आणि टेम्पोची धडक झाली. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत.

खालापूर टोलनाक्याजवळ कार आणि टेम्पोची जोरदार धडक झाली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होती. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
accidentExpressway 3 DiedmumbaiPune