दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी भारताला विजयासाठी हव्यात 208 धावा

केपटाऊन –पहिल्या डावात भारतावर 77 धावांची आघाडी घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात मात्र भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकली आहे. चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 130 धावांतच गारद झाला. त्यामुळे पहिल्या कसोटीत भारताला विजयाची संधी आहे. भारताला विजयासाठी 208 धावांची गरज आहे.

शमी आणि बुमराह यांनी प्रत्येकी तीन तर पांड्या आणि भुवनेश्वर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला होता. पण चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेकडून एबी डिव्हीलियर्सने सर्वाधिक 35 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 286 धावांवर आटोपण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले होते. खेळाच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांची श्रीलंकेच्या सर्व फलंदाजांना 286 धावांवर बाद केले होते. त्यावेळी भवनेश्वर कुमारने 4 तर अश्विनने 2 बळी घेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची फजिती उडवली होती.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले आणि भारताचा संपूर्ण डाव 209 धावांवर गुंडाळला होता. रबाडा, फिलेंडर, स्टेन, मॉर्केल सर्वांनीच अचूक गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांवर हल्ला चढवला. हार्दिक वगळता कोणत्याही भारतीय फलंदाजाचा पहिल्या डावात टिकाव लागू शकला नव्हता. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 77 धावांची पिछाडी मिळाली होती. पण आता आफ्रिकेचा संघ लवकर बाद होत असल्याने भारताच्या आशा पुन्हा एखदा वाढलेल्या आहेत.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
CricketInd Vs SA