टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट .

महाराष्ट्रात यापुढे टोल नाके नकोत म्हणून हायब्रीड ऑन्युटी तत्त्वावर ३० हजार कोटी रुपये खर्चाचे १० हजार किलोमीटरचे रस्ते राज्यात बांधण्यात येतील. या रस्त्यांवर कुठेही टोल आकारला जाणार नाही. छोटी चारचाकी वाहने वगळून मोठ्या वाहनांना टोल लावण्याचे सरकारचे धोरण आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात मुंब्रा बाह्यवळण रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना पाटील यांनी हायब्रीड ऑन्युटी तत्त्वावरील रस्त्यांची माहिती दिली. आव्हाड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा बाह्यवळण रस्त्याची देखभाल दुरुस्ती थांबल्याने हा रस्ता पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी त्यावर टोल बसवला जाईल, असे त्यांनी सांगितले. या बाह्यवळण रस्त्याचे काम केलेल्या कंत्रातदारासोबत पुढील आठवड्यात सोमवारी वा मंगळवारी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबईतीळ पाच प्रवेशद्वारावर छोट्या वाहनांना टोल आकारू नये, यासंदर्भातील अहवाल वित्त खात्याकडे पाठवला आहे. वित्त विभाग छोट्या वाहनांना टोलमधून वगळण्याच्या व्यवहार्यतेवर विचार करत असल्याचे पाटील यांनी एका उत्तरात सांगितले.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
carsuitetoll