रामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते – आनंदराज आंबेडकर

कोरेगाव भीमाच्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला मिळालेल्या प्रतिसादामुळे सुरू झालेली रिपब्लिकन ऐक्याची चर्चा व्यर्थ आहे. रिपब्लिकन ऐक्य हा संपलेला विषय आहे. सध्या रिपब्लिकन नेत्यांना फक्त धड असून त्यांचे डोके भलतेच वापरून घेत आहेत. रामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते असल्याची टीका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली.
आंबेडकर यांनी सोमवारी वढू येथील गोविंद गायकवाड यांच्या समाधीसह कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला भेट दिली. यासोबतच त्यांनी पोलीस अधीक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त अधिक्षक संदीप पखाले यांची भेट घेऊन तपासाची माहिती घेतली. याकसंदर्भात त्यांनी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
Bhima-koregaonmaharashtraRamdas Athawaleभीमा-कोरेगावमहाराष्ट्ररामदास आठवले