पंतप्रधान मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शिवजयंतीनिमित्त आपल्या ट्विटर अकाऊंटवरील संदेशाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना वाहिली. मोदींनी एक व्हिडीओ पोस्ट करत महाराजांच्या जयंतीनिमित्त एक महत्त्वाचा संदेशही दिला आहे. शिवाजी महाराजांसारखे शूर आणि महान व्यक्तीमत्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारताला अभिमान आहे. शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही, असे मोदींनी या व्हिडीओत म्हटले आहे.

तसेच या व्हिडीओच्या माध्यमातून मोदींनी देशातील जनतेला एक आवाहनही केले आहे. त्यासाठी मोदींच्या पूर्वीच्या भाषणांचा संदर्भ वापरण्यात आला आहे. दरदिवशी प्रत्येक भारतीयाने किमान एका व्यक्तीची सेवा करावी, तरच या सेवेच्या माध्यमातून आपण महाराजांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करु शकतो, असं ते एका भाषणात म्हणाले होते. याशिवाय, मोदींनी त्यांच्या भाषणादरम्यान ‘जय भवानी जय शिवाजी’ केलेल्या जयघोषाचाही व्हिडीओमध्ये कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. आज शिवजयंतीनिमित्त राज्यभरात शासकीय कार्यक्रमांसह अनेक संस्थांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा