नागालँड, त्रिपुरामधीलआणि मेघालय मतदानाच्या तारखा जाहीर

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. त्रिपुरामध्ये १८ फेब्रुवारी रोजी तर नागालँड आणि मेघालयात २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून या तिन्ही राज्यांमधील मतमोजणी ३ मार्च रोजी होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती यांनी केली.

मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन या तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. या तिन्ही राज्यांतील विधानसभेची सदस्यसंख्या प्रत्येकी ६०-६० आहे. नागालँडच्या विधानसभेचा कार्यकाळ १३ मार्च रोजी, मेघालयाच्या विधानसभेचा ६ मार्च रोजी आणि त्रिपुरा विधानसभेचा कार्यकाळ १४ मार्च रोजी संपुष्टात येत आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
ecectionecection commissionmeghalaynagalandtripura