भारताकडे 180 पेक्षा जास्त धावांची आघाडी,भारताचे दोन गडी बाद.

नवी दिल्ली : दिल्ली कसोटीत चौथ्या दिवशी उपाहारापर्यंत टीम इंडियानं दुसऱ्या डावात बाद धावांची मजल मारली आहे. सलामीवीर मुरली विजय आणि वरच्या क्रमांकावर बढती मिळालेला अजिंक्य रहाणे स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारानं भारताचा डाव सावरला. उपाहारावेळी खेळ थांबला तेव्हा शिखर धवन 15 तर पुजारा 17 धावांवर खेळत होते.

दरम्यान श्रीलंकेचा पहिला डाव 373 धावांत संपुष्टात आला. श्रीलंकेनं कालच्या 9 बाद 356 या धावसंख्येत केवळ 17 धावांची भर घातली. ईशांत शर्मानं कर्णधार दिनेश चंडिमलला माघारी धाडत भारताला पहिल्या डावात 163 धावांची आघाडी मिळवून दिली. चंडिमलनं 21 चौकार आणि एका षटकारासह 164 धावांची दमदार खेळी उभारली.

भारताकडून ईशांत शर्मा, रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी तीन तर मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजानं दोन प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. दरम्यान टीम इंडियानं दुसऱ्या डावात मुरली विजयची आणि रहाणेची विकेट गमावताना 34 धावा जमवल्या आहेत.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
Cricketindia