शानदार शतक मुरली विजय-विराट कोहलीचे

नवी दिल्ली – श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात भारतीय संघ भक्कम स्थितीमध्ये आहे. सलामीवीर मुरली विजयपाठोपाठ कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं. त्याच कसोटी क्रिकेटमधील हे 20 व शतक आहे.  शतकी खेळीत त्याने 14 चौकार लगावले.   नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेणा-या भारताच्या दोन विकेट गमावून 250 पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. सलामीवीर मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहलीची जोडी मैदानावर असून त्यांच्यामध्ये तिस-या विकेटसाठी 160 पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली आहे.  सलामीवीर शिखर धवन (23) आणि चेतेश्वर पूजारा (23) धावांवर बाद झाले. परेरा आणि गामागेने प्रत्येकी एक विकेट घेतला.

विजयी पथावर अग्रेसर असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंकेविरुद्ध तिस-या आणि अखेरच्या कसोटीत इतिहास रचण्याची संधी आहे. फिरोजशाह कोटलावर सुरू होत असलेला सामना जिंकून सलग नववी मालिका खिशात घालण्यास भारतीय खेळाडू सज्ज आहेत. दरम्यान, तिसऱ्या आणि निर्णयाक लढतीत विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नागपूर कसोटीत सुमार कामगिरी करणाऱ्या उमेश यादव आणि के. एल राहुल यांना संघातून वगळण्यात आलं आहे. त्यांच्या जागी मोहम्मद शामी आणि शिखर धवन यांचे पुनरागमन झालं आहे. घरगुती कारणामुळे दुसऱ्या कसोटीतून शिखर धवन याने माघार घेतली होती.

दरम्यान, विजयी पथावर अग्रेसर असलेल्या विराटसेनेला श्रीलंकेविरुद्ध तिस-या आणि अखेरच्या कसोटीत इतिहास रचण्याची संधी आहे. फिरोजशाह कोटलावर सुरू होत असलेला सामना जिंकून सलग नववी मालिका खिशात घालण्यास भारतीय खेळाडू सज्ज आहेत.

नागपुरात दुस-या कसोटीत एक डाव २३९ धावांनी विजय मिळवित भारताने १-० अशी आघाडी घेतली होती. याआधी ओळीने आठ मालिका जिंकण्याची कामगिरी विराटच्या संघाने केली. कोटलावर सामना बरोबरीत राहिला तरीही सलग नऊ सामने जिंकण्याच्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या विक्रमाशी भारत बरोबरी करेल. भारताने २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात मालिका गमविली होती. तेव्हापासून भारताने नऊ मालिका खेळल्या व सलग आठ जिंकल्या. मायदेशात पाच तसेच श्रीलंकेत दोन व वेस्ट इंडिजमध्ये एक मालिका विजय साजरा केला. भारताने मागील २३ पैकी तब्बल १९ कसोटी सामने जिंकले. एकमेव सामना गमावला तो आॅस्ट्रेलियाविरुद्ध. द. आफ्रिका दौºयापूर्वी हा अखेरचा कसोटी सामना असेल्याने कोहलीच्या इच्छेनुसार कोटलाची खेळपट्टी हिरवीगार ठेवण्यात येत आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
Cricketindia-srilankamurli vijayteam indiatest cricketvirat kholi