भारताने मालिकाही गमावली

सेंच्युरियन :दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा १३५ धावांनी दारुण पराभव केला असून या सामन्याबरोबर भारताने २-० अशा फरकाने मालिकाही गमावली आहे.

दक्षिण आफ्रिकेने भारताला विजयासाठी २८७ धावांचे आव्हान दिले होते मात्र भारताचा संपूर्ण संघ १५१ धावांत गारद झाला. भारताकडून सर्वाधिक ४७ धावा रोहित शर्माने केल्या.

लुंगी गिडी दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने सहा बळी टिपून भारताच्या डावाला सुरुंग लावला

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
BCCICricketIndia-SouthAfrica-Test