पुण्यात कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुण्यात ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या ‘कबीर कला मंच’च्या कार्यकर्त्यांवर पुण्यात गुन्हा दाखल झालाय.

चिथावणीखोर वक्तव्य आणि जमावास गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. कोरेगाव भीमात १ जानेवारीला झालेल्या दंगलीला कारणीभूत असल्याचा संशय आहे.

सुधीर ढवळे, सागर गोरख, हर्षाली पोतदार, रमेश गायचोर, दीपक डेंगळे, ज्योती जगताप या कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. पुण्यातील विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक तुषार रमेश दामगुडे यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिलीय.

याआधी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी आणि विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्या विरोधातही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.शनिवारवाड्यावर झालेल्या वादग्रस्त एल्गार परिषदेवर पुणे पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल करत समाजात तेढ निर्माण केली असल्याचा ठपका ठेवला आहे. याच परिषदेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्यावर यापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर भारतीय दंडसंहिता कलम १५६ (३) (ए) नुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
Kabir Kala ManchPune