अकोला एमआयडीसीमध्ये भीषण आग

अकोला : अकोला एमआयडीसी क्रमांक तीनमधील ग्रीन पावर टेक्नॉलॉजी या इलेक्ट्रॉनिक अप्लिन्सेसच्या मोठ्या फॅक्ट्रीला भीषण आग लागली. या आगीत इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झालं. ही आग शॉट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.

भीषण आग

नागरिकांनी या आगीची माहिती अग्निशामक दल आणि पोलीस विभागाला दिली. आगीचं गांभीर्य लक्षात घेता अग्निशामक दलाच्या 3 गाड्या घटना स्थळी रवाना करण्यात आल्या.

अग्निशामक दलाला तारेवरची कसरत

ही आग एवढी भीषण होती की ही आग विझवण्यात अग्निशामक दलाला तारेवरची कसरत करावी लागली. अखेर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना मिळालं. या आगीत करोडो रुयांच नुकसान झालं असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
akola firemaharashtraMIDC