चंद्राबाबू नायडूंच्या निर्णयानंतर तेलुगू देशम आणि भाजपा समर्थकांमध्ये ट्विटर वॉर

नवी दिल्ली – तेलगू देशमचे नेते आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमॆडळातून आपल्या मंत्र्यांना बाहेर पडण्याचे आदेश दिल्यानंतर ट्विटरवर एक वेगळं युद्ध भडकले आहे. तेदेपा समर्थक आणि भाजपा समर्थक यांच्यातील हे युद्ध चर्चेचा विषय ठरले आहे.

“मी पंतप्रधानांना आमच्या निर्णयाची माहिती पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने ते उपलब्ध नव्हते!” चंद्राबाबू यांना बुधवारी रात्री 11वाजून 34 मिनिटांनी हे ट्विट केले. त्यानंतर पाच मिनिटांनी त्यांनी दुसरं ट्विट करुन “निर्णायक वेळ. आपण उभं ठाकलंच पाहिजे. आपण लढलंच पाहिजे. आपण करुन दाखवलंच पाहिजे.” असं दुसरं ट्विट केलं आहे. त्यांच्या ट्विट्सवर समर्थन देणाऱ्या प्रतिक्रिया जशा व्यक्त होत आहेत तशाच नकारात्मकही.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
Andhra pradeshBJPchandra babu naidutdp