एअर सेल्फी

सेल्फी काढताना काही अडचणी असतात जसे कि सेल्फी काढणाऱ्याचा चेहरा इतरांच्या मानाने मोठा दिसतो. शिवाय सेल्फी पॉईंटवर जर जागा कमी असेल आणि तुमचा मित्रांचा ग्रुप मोठा असेल तर सर्वजण सेल्फी मध्ये येत नाही . सेल्फी स्टिक मुळे काही प्रमाणात ही समस्या दूर झाली असली तरी सुद्धा ग्रुप मधील सर्व जण फोटोत येत नाही. मग यावर उपाय काय तर कोणीतरी एका मित्राने बलिदान देऊन इतरांचा फोटो काढायचा. मात्र फोटो कोणी काढायचा म्हणजेच बलिदान कोणी द्यायचे यावर सुद्धा अनेकदा ग्रुप मध्ये वाद होतात. कारण प्रत्येकालाच फोटोत आपण असावे असे वाटते. मात्र आता एक असे तंत्रज्ञान आले आहे ज्याचा वापर करून तुम्ही कुणाचेही बलिदान न देता सेल्फी काढू शकता अगदी कितीही मोठा मित्रांचा ग्रुप असला तरीही |

काय आहे नेमकं एअर सेल्फी ?
हा एक स्मार्टफोन साईज चा आणि वजनाने हलका असा ड्रोन कॅमेरा आहे. अॅल्युमिनियमपासून बनविलेल्या या ड्रोनचे वजन फक्त ५० ते ६५ ग्रॅम आहे . हा ड्रोन कॅमेरा  ऍप च्या माध्यमातून स्मार्टफोन वरून कन्ट्रोल केल्या जातो . या ड्रोनला ५ एमपीचा एच डी कॅमेरा दिला गेला आहे. हा ड्रोन कॅमेरा स्वतः च्या वायफाय ने स्मार्टफोन ला कनेक्ट करता येतो . यामध्ये उच्च प्रतीचे विविध सेन्सर वापरले असून त्यांच्या मदतीने उच्च प्रतीचे फोटो काढता येतात .या ड्रोन मध्ये चार मायक्रो मोटर्स असून हे ड्रोन २० मीटर उंचीवरूनही झूम करून चांगल्या सेल्फी काढू शकते. याच्या सहाय्याने मोठ्या रेंजमध्येही सेल्फी घेता येतात. हे ड्रोन वायफायशी कनेक्ट होते. उडण्यासाठी तसेच फोटो क्लिक करण्यासाठी त्याला पॉवरफुल बॅटरी दिली गेली आहे . या ड्रोन मध्ये वापरलेली बॅटरी ३० मिनिटात चार्ज करता येते. या ड्रोन मध्ये ४ जीबीचे स्टोरेजही आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
Air selfiDrone cameraTechnology