हृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन

मुंबई – बॉलिवूडमधील अभिनेते नरेंद्र झा यांचे बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यापूर्वी देखील त्यांनी दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला होता. वाडा येथील फार्म हाऊसवर असताना त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.  नरेंद्र झा हे कुटुंबीय आणि खास मित्रपरिवारासोबत आपल्या फार्म हाऊसवर गेलेले असताना ही दुर्दैवी घटना घडली.  नरेंद्र झा यांनी ‘शांति’, ‘छूना है आसमान’, ‘एक घर बनाऊंगा’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. टीव्ही मालिकांव्यतिरिक्त ‘अधूरी कहानी’, ‘घायल वन्स अगेन’, मोहनजो दाड़ो’, ‘शोरगुल’, ‘काबिल’, ‘हैदर’ यांसारख्या सिनेमांमध्येही ते झळकले आहेत.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
ActorFilmJhaKabilNarendraRaees