गौरी खानला लोकांनी दिला मर्यादेत राहण्याचा सल्ला; वाचा काय आहे मामला!!

काल २ नोव्हेंबरला शाहरूख खानचा बर्थ डे धूमधडाक्यात साजरा झाला. अलीबागच्या शाहरूखच्या फार्महाऊसवर धम्माल पार्टी रंगली. या पार्टीत शाहरूख, त्याची पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना खान, मुलगा अबराम असे सगळे दिसले. याशिवाय शाहरूख व गौरीच्या जवळच्या इंडस्ट्रीतील काही खास सेलिब्रिटींनीही या पार्टीला हजेरी लावली. या सेलिब्रेशनचे काही इनसाईड फोटोही पाहायला मिळालेत. अगदी काही क्षणात आग पसरावी तसे हे फोटो वेगाने व्हायरल झालेत. अनेक फोटोंना चाहत्यांचे हजारो-लाखों लाईक्स मिळालेत. पण या फोटोंमधील एक फोटो मात्र चाहत्यांना खटकला. हा फोटो होता शाहरूखची पत्नी गौरी खान हिचा. या फोटोवरून गौरीना नेटिजन्सनी चांगलेच ट्रोल केले.

या फोटोत गौरीने व्हाईट कलरचा ड्रेस घातलाय. या ड्रेसमधून गौरीची पिंक कलरची ब्रा दिसतेय. गौरीचा नेमका हाच फोटो लोकांना खटकला आणि मग लोकांनी गौरीला नाही, नाही त्या शब्दांत सुनावले. केवळ सुनावलेच नाही तर गौरीला मर्यादेत राहण्याचा आणि वयाकडे बघून फॅशन करण्याचा सल्लाही दिला. एका युजरची तर गौरीला ‘थर्ड क्लास’ म्हणण्यापर्यंत मजल गेली. तीन मुलांच्या आईला असले कपडे शोधत नाही, असे एका युजरने सुनावले. काहींनी गौरीचा ड्रेस सेन्स काढला. तुझा ड्रेस सेन्स अगदीच वाईट आहे, असे कमेंट्स त्यांनी लिहिले.
खरे तर गौरी खान पहिल्यांदा ट्रोल झालेली नाही. यापूर्वीही अनेकदा गौरी ट्रोल झाली आहे. कधी तिच्या हेअर कलरमुळे तर कधी मेकअपमुळे तिला ट्रोल व्हावे लागलेय. अर्थात गौरी खान असल्या ट्रोलिंगची पर्वा करण्यांपैकी नाहीच. अद्याप गौरीने ट्रोल करणा-यांना उत्तर दिलेले नाही. त्यामुळे गौरी या सगळ्यावर काय बोलते, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.
अलीकडे मुंबईच्या जुहू भागात गौरी खानच्या भव्य डिझाईनर स्टोर्सचे उद्घाटन झाले. आत्ता आत्तापर्यंत गौरी खान शाहरूख खानची पत्नी म्हणूनच ओळखली जायची. पण अलीकडे गौरीने इंटीरिअर डिझाईनर म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रणबीर कपूरपासून करण जोहरच्या मुलांच्या खोलीपर्यंतचे इंटीरिअर गौरी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा