आंतराष्ट्रीय

अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले खडेबोल !

हाफिजविरोधात खटला चालवा, अमेरिकेचा दम

Hafiz Saeed

 नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाने दहशतवादी म्हणून घोषित केलेला मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदवरून अमेरिकेने पाकिस्तानला झापले आहे. हाफिज मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे, त्याच्याविरोधात खटला चालवा, असा दमच अमेरिकेने पाकला भरला आहे.
अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्या हीथर नॉर्ट यांनी आज पाकिस्तानला फैलावर घेत दम भरला आहे. ‘हाफिज सईदला आम्ही दहशतवादी म्हणूनच पाहतो. तो २००८ मध्ये मुंबईत झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड असून या हल्ल्यात अनेक अमेरिकन नागरिकही मारल्या गेले आहेत. त्यामुळे हाफिजवर खटला भरा,’ असं हीथर नॉर्ट यांनी पाकला बजावलं आहे. दरम्यान, मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी हाफिजवर कोणतेच गुन्हे नसल्याचं सांगताना हाफिजचा उल्लेख ‘हाफिज साहिब’ असा केला होता.

त्यावर हीथर यांनी जोरदार आक्षेप घेतला. लष्कर-ए- तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याने संयुक्त राष्ट्र संघाने हाफिजचा मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आम्ही पाकसमोर मांडलं आहे, असंही त्या म्हणाल्या.

‘अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधाबाबत संपूर्ण अमेरिकन प्रशासनाचं एकमत आहे. त्यामुळेच या महिन्याच्या सुरुवातीला आम्ही पाकला देण्यात येणारी दोन अब्ज डॉलरची मदत थांबविली होती. पाकिस्तानने दहशतवादाविरोधात ठोस कारवाई न केल्यानेच आम्ही हे पाऊल उचलले होते,’ असंही हीथर यांनी शेवटी स्पष्ट केलं

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: