पुणे

पुण्यात देवाची उरळी येथे प्लॅस्टिक गोडाऊनला भीषण आग.

देवाची उरळी येथे प्लास्टिक सामानाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

pune

पुण्यातील उरुळी देवाची येथील प्लास्टिक भंगाराच्या गोदामाला बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक विभागाच्या आधिकायांनी दिलेल्या माहितीनुसार,उरुळी देवाची येथे लकी एन्टरप्राईजेस हे प्लास्टिकचे गोदाम आहे. आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास येथे आग लागली. आगीची वर्दी मिळताच अग्निशामन दल याठिकाणी तातडीने दाखल झाले. मात्र, अजूनपर्यंतही ही आग पूर्णपणे विझलेली नाही. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत दोन दुचाकी आणि एक ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तसेच या आगीत जवळपास २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: