राष्ट्रीय

काबूलमध्ये भीषण आत्मघातली हल्ला, 40 जण ठार, 30 हून अधिक जखमी

त्यात किमान 40 लोक मारले गेल्याची आणि 30 जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

Afghan

काबूल – येथील पश्चिम परिसरातील शिया कल्चरल अँड रिलीजियस ऑर्गनायझेशनवर एक आत्मघातली हल्ला झाल्याची बातमी आहे. त्यात किमान 40 लोक मारले गेल्याची आणि 30 जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने घेतलेली नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले की, मृतांची संख्या अधिक वाढली आहे. स्थानिक माध्यमांच्या मते, कार्यक्रमाच्या कार्यालयात मीडिया ग्रुपचे सदस्य चर्चा करत असताना हा हल्ला झाला.

स्थानिक तोलो न्यूजने परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने 40 जणांचा मृत्यू झाल्याचे आणि 30 जण जखमी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांच्या मते, मारल्या गेलेल्यांमध्ये बहुतांश महिला, मुले आणि पत्रकारांचा समावेश आहे.याचवर्षी मे महिन्यात काबूलमधील भारतीय दुतावासाजवळही हल्ला झाला होता. त्यात जवळपास 90 जण ठार झाले होते. 300 हून अधिक जखमी झाले होते.

अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाचे उप प्रवक्ते नसरत रहिमी यांनी या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. ‘हल्लेखोरांनी तबायान सांस्कृतिक केंद्राला लक्ष्य करून हा हल्ला केला आहे,’ असं नसरत रहीमी यांनी सांगितलं. या स्फोटातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. या संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेतला आहे. विशेष म्हणजे सोव्हिएत संघाच्या अफगाणिस्तानवरील आक्रमणाला आज ३८ वर्ष पूर्ण होत आहेत, अशा वेळीच हा हल्ला झाल्याने हल्ल्यामागचे तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: