महाराष्ट्रयवतमाळराष्ट्रीयशिक्षण

यवतमाळात निघाला शिक्षकांचा महामोर्चा

विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वात शनिवारी शिक्षकांनी महामोर्चा काढला.

यवतमाळ : विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वात शनिवारी शिक्षकांनी महामोर्चा काढला.
येथील जिल्हा परिषदेजवळून दुपारी १ वाजताच्या सुमारास या महामोर्चाला सुरु वात झाली. बसस्थानक चौक, नेताजी चौक, पोलीस ठाणे, पाच कंदील चौक, महात्मा फुले चौक मार्गे हा मोर्चा तिरंगा चौकात पोहोचला. तेथे मोर्चाचे रु पांतर सभेत झाले. समन्वय समितीचे पदाधिकारी राजूदास जाधव, मधुकर काठोळे, ज्ञानेश्वर नाकाडे, रमाकांत मोहूरकर आदींनी सभेला संबोधित केले. आॅनलाईन चुकांची दुरु स्ती केल्यानंतरच शिक्षकांच्या बदल्या कराव्या, २००५ नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. नंतर मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: