क्रिकेटक्रीडानागपुर

भारत 11/1 (8.0) vs श्रीलंका 205 (79.1)

नागपुर मध्ये झालेल्या सामन्यात श्रीलंका २०५ वर गारद

नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेरीस भारताने सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. पहिल्या डावात श्रीलंकेला २०५ धावांवर सर्वबाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ही ११/१ अशी होती. त्याआधी इशांत शर्मा, रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजाच्या माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ कोलमडला.

चहापानानंतरच्या सत्रात एकामागोमाग एक विकेट जाण्याचं सत्र सुरुच राहिलं. यामुळे श्रीलंकेच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे उद्याच्या दिवसात भारतीय संघ श्रीलंकेच्या गोलंदाजीला कसा सामोरा जातो हे पहावं लागणार आहे.श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणारा दुसरा कसोटी सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासातील ५० वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. जामठा स्टेडियममध्ये यजमान संघ सहावा कसोटी सामना खेळणार आहे. आतापर्यंत भारतीय संघाने ३ विजय (एक अनिर्णीत व एक पराभव) मिळवताना या मैदानावर वर्चस्व गाजवले आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: