क्रीडाहॉकी

भारत-ऑस्ट्रेलिया युवा खेळाडूंचा आक्रमक खेळ सामना बरोबरीत

भुवनेश्वर पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करणे भारतीय हॉकी संघाला जमतच नाही. अन् यात अजूनही सुधारणा झालेली नाही, याचा प्रत्यय शुक्रवारी हॉकी वर्ल्ड लीग फायनल स्पर्धेतील सलामीच्या लढतीतदेखील आला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध १-० आघाडी घेणाऱ्या भारताला अखेरीस मात्र १-१ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले.

कलिंगा स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने दणक्यात सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या हाफमध्ये आक्रमण करत मनदीपसिंगने दुसऱ्याच सत्रात भारताला आघाडी मिळवून दिली. भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठवता आला नाही. खरेतर रुपिंदरपालसिंग आणि हरमनप्रीतसिंग अशी अनुभवी अन् तरुणरक्ताची साथ भारताकडे होती; पण गोलरुपी फलित लाभलेच नाही. जागतिक रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा गोलकीपर टेलर लोव्हेलने भारताच्या तज्ज्ञड्रॅगफ्लिकरना निष्फळ ठरवले. गुर्जंतसिंगचा एक रिबॉन्ड फटका त्याने लिलया परतवला. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दुसरा गोल केला तो जर्मी हेवर्डने.

ऑस्ट्रेलियाचा गोलकीपर टेलरचे कौतुक करताना भारताचा गोलकीपर आकाश चिकटेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यानेही ऑस्ट्रेलियाची आक्रमणे थोपवली. पहिल्या सत्रात भारताचा आकाशदीप सातत्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलपोस्टवर आक्रमणे करत होता; पण गोलची पाटी कोरी होती.

आकाशदीपला मात्र ऑस्ट्रेलियाने खूप सतावले. त्याला गोल करण्याच्या बऱ्यापैकी संधी होत्या. काही संधी त्याने स्वतःच्या चुकीनेही गमावल्या.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: